Get Adobe Flash player

मुखपृष्ठ

वर्षानुवर्षे ऋतुचक्र निर्मित ऊन, थंडी,वारा,पाऊस यानां समर्थपणे तोंड देत असतानाच आपल्या शीतल छायॆखाली पांथस्थांना सावली देणार्‍या महान वटवृक्षाप्रमाणे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ गेली ८८ र्वर्षे अव्याहतपणे आपल्या धार्मिक सामाजिक , शैक्षणिक , आणि सांस्कृतिक कार्याद्वारे लालबाग,चिंचपोकळी सारख्या कामगार विभागात कार्यरत आहे.सार्वजनिक उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना उत्सवातून अभिप्रेत असलेले समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणाचे कार्य हेच या उत्सव मंडळाच्या कार्याचे मूळसूत्र आहे. सेवाभावी संस्थेचे काम पक्षातीत असले पाहिजे हा या मंडळाचा प्रारंभापासूनच कटाक्ष होता,गेल्या २५ वर्षात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपली राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून उत्सव मंडळाच्या कार्याचा हा रथ पुढे नेत आहेत हे आवर्जून नमूद करावयास हवे.हे मंडळ म्हणजे कार्यकर्ते निर्माण करण्याची कार्यशाळा आहे असे म्हटले जाते. मंडळाच्या माध्यमातून कामास सुरवात करुन आज विविध स्तरांवर हे कार्यकर्ते नावारुपास आलेले आहेत याचा ,मंडळास रास्त अभिमान आहे.वैचारीक अधिष्ठान व सेवा हाच स्थायीभाव असलेल्या या उत्सव मंडळासारख्या संस्था सामाजिक जीवन संपन्न व सुसंस्कृत करतात. समाजाची सर्व दु:खे जरी दूर करता आली नाहीत तरी ती सुसह्य करण्यासाठी झटतात व समाजात जागल्याचे काम करतात.म्हणूनच समाज ,सरकार,राजकीय पक्ष,प्रसिध्दी माध्यमे ,दानशूर संस्था यांनी आपले सक्रीय पाठबळ अशा संस्थेच्या मागे उभे केले पाहिजे.सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे आव्हानांना मंडळाने कधीच पाठ दाखविलेली नाही किबंहूना प्रश्नांना हात घालीतच मंडळाची वाटचाल झालेली आहे.आजची विभागातील तरुण पिढी सुशिक्षित ,सुसंस्कृत आहे. मंडळ गेली कित्येक वर्षे जमविलेल्या निधीचा फार मोठा हिस्सा शैक्षणिक कार्यावर खर्च अशा वेळी सामाजिक बांधिलकी म्हणून किमान २ वर्षे या तरुण पिढीने मंडळाच्या कार्यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा मंडळाने केली तर वावगे ठरणार नाही.मंडळाच्या कार्याची राज्य पातळीवर विविध संस्था, प्रसिध्दी माध्यमे यांनी योग्य ती दखल घेतलेली आहे. तेव्हाचे दैनिक लोकसत्ताचे संपादक श्री माधवराव गडकरी यांनी दिनांक १८/०८/९५ च्या अग्रलेखात मंडळाचा केलेला गौरव हेच उदाहरण वानगीदाखल पुरेसे ठरेल. सामाजिक धनाचे आपण विश्वस्त आहोत ही विश्वस्तांची भावना आज मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात आहे.म्हणूनच अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतानाच समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देतो हा विचार मनात ठेवून मंडळ उभारीत असलेल्या व आपण या सर्वांचे स्वप्न असलेल्या आरोग्य केंद्राची उभारणी या वर्षात पूर्ण करुन ती समाज चरणी अर्पण करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.मंडळाचे अनेक कार्यकर्ते गेली २५ वर्षे सातत्याने आपआपला कामधंदा सांभाळून मंडळाच्या उत्कर्षासाठी झटत आहेत. त्यातील काहीजण तर रौप्य ,सुवर्ण व हीरक महोत्सवाचे साक्षीदार आहेत. आज हा अमृत महोत्सव साजरा करण्याचे सदभाग्य याची देही याची डोळा त्यांना लाभलेली आहे.ही तर त्या जगन्नियंत्याची कृपा. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये उत्सव मंडळाने फार मोठे काम केलेले आहे असं आमच कधीच म्हणणं नव्हत आणि असणार ही नाही.'अपूर्णावस्थेतच पूर्णत्वाचे बीज असते ' जेव्हा पूर्ण विकास झाल्यावर भास होतो तेथे विकास खुंटतो या विचार सरणीवर आज आम्हा सर्व कार्यरत कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.या कामामध्ये आमच्याही काही चुका झाल्या असतील परंतु TO ERR IS A HUMAN NATURE या वाक्याने या चुका आपण सर्वांनी समजून घेतल्या .सर्व जनता जनार्दन वर्गणीदार ,देणगीदार ,जाहिरातदार ,हितचिंतक तनमनधनाने या मंडळाची एकरुप झालेत.गेल्या ८९ वर्षाच्या कालावधीत असंख्य व्यक्ती ,संस्थानी या उत्सव मंडळाच्या जडणघडणीत जे योगदान दिले त्याबद्दल मंडळ त्यांना सदैव मानाचा मुजरा करीत आहे.याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे आमच्या या ९० व्या वर्षाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना हार्दीक निमंत्रण देत आहोत.त्या अनुषंगाने महोत्सवाच्या निमित्तने आपल्यात निर्माण झालेले ऎक्य व सद्भावना मंडळाच्या शताब्दी वर्षाकडे उज्वल वाटचाल करण्याकडे परावर्तीत होवो व यावच्वंद्र दिवाकरी उत्सव मंडळाच्या कार्याचा हा नंदादीप अविरतपणे तेवत राहो.फुटीरता व जातियता यांनी ग्रासलेली आपली भारत मातृभूमी पुन्हा एकदा अखंड बलशाली व सुवर्णभूमी व्हावी.आपणा सर्वांना वैभव व सौख्य लाभावे हीच श्री गणराय व अंबाभवानीकडे प्रार्थना

कार्यक्रम दिनदर्शिका

सोशल नेटवर्क


जाहिरात फलक